भालावल ग्रामपंचायतच्या वतीने फुलविली समूह शेती…

भालावल ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.३१-: भालावल ग्रामपंचायत वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतन राज अभियान अंतर्गत “समूह शेती” कार्यक्रम हाती घेतला असून ,याचाच एक भाग म्हणून गावात नाचणी पीक लागवड सामूहिकरीत्या केली आहे.
भालावल ग्रामपंचायतीने विशेष योजना लाभार्थी यांना अनुदानित केलेले आहे. या योजनेचा उद्देश सुधारित बियाणे उपलब्ध करून यातूनच पुढील वर्षी उर्वरित शेतकऱ्यांना बियाणे खास भेट म्हणून देण्याचा निर्णय ग्रामपंचायत तिने केलेला आहे .याचा मुख्य उद्देश हा ग्रामपंचायत अभिक्षेत्रात सुधारित बियाणे वापरून शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचा आहे असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे यांनी सांगितले.
तसेच या उपक्रमाचा गावातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच समीर परब यांनी केले.
या उपक्रमाबद्दल गावातील ग्रामस्थांनी,शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page