Headlines

हडी येथे हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रम…

⚡मालवण ता.३१-:
मालवण तालुक्यातील हडी कोथेवाडी मधलीवाडी येथील श्री देव मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त बुधवार १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता श्री देव मारुती नाट्यमंडळ, हडी – कोथेवाडी यांच्यावतीने ‘नाना फाटले…’ हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. कै. सत्यवान शेडगे प्रस्तुत या नाटकाचे लेखन प्रवीण शांताराम यांनी केले असून दिग्दर्शन महेश सावंत पटेल यांचे आहे. तसेच गुरुवार, २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी स्थानिकांची भजने होणार आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page