कोळंब येथे नाटेकर आजींचा तपपूर्ती सोहळा

मालवण ता.३१-:
कोळंब येथील श्री संत नाटेकर आजींचा ३१ वा तपपूर्ती सोहळा गुरुवार दि. २ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ८.३० वा. दुग्धाभिषेक व लघुरुद्र, १०.३० वा. गायन, दुपारी १२ वा. आरती, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री नामदेव महाराज भक्त मंडळ यांचे वारकरी चक्रीभजन, सायंकाळी ४ वा. कलावती आई मंडळाचे भजन, ६ वा. भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वा. कोळंब न्हिवे कांदळगाव येथील भजन मंडळाचे भजन सादर होणार आहे. लाभघ्यावा, असे आवाहन माताजी नाटेकर सेवामंडळ अध्यक्ष भालचंद्र शांताराम प्रभूगावकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page