⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांवर मठ कार्यक्षेत्रात अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान मठ टाकयेवाडी व पेट्रोलपंप नजिक येथील दोन स्पॉटवर धोकादायक स्थितीमुळे वारंवार छोट्या वाहनांचे अपघात होत होते. याबाबत मठ येथील शिवसेना पदाधिकारी उमेश नाईक यांनी मठ सरपंच यांचे लक्ष वेधले होते. तसेच टाकयेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनीही याबाबत शासनाचे लक्ष वेधले होते..त्यानंतर याची दखल घेण्यात न आल्याने उमेश नाईक यांनी वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती यांची आज सोमवारी सकाळी भेट घेतली व धोकादायक स्पॉट ची माहिती दिली. याबाबतची माहिती घेऊन सचिन देसाई यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याशी संपर्क साधून धोकादायक खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सायंकाळी संबंधितानी त्वरित धोकादायक ठरणारे खड्डे बुजविण्यात आले व उर्वरित काम करण्यात येणार आहे. उपसभापती सचिन देसाई यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेबद्दल वाहधारकातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान पावसाळा हंगाम जवळ येत असून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यात यावे, पावसाळ्यात संभाव्य अपघात टाळण्यासाठी भराव व्यवस्थित पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी उमेश नाईक यांनी केली आहे.
वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांची कार्यतत्परता…
