आयनोडे येथे रामनवमी, एकादशी सप्ताह व हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन…

दोडामार्ग, २३ : आयनोडे पुनर्वसन येथील श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थानाच्या वतीने रामनवमी, एकादशी सप्ताह व हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ मार्च रोजी रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव, आरती व महाप्रसाद होणार असून रात्री ‘सिंह गर्जला रणी’ हे नाटक सादर होईल. २९ ते ३० मार्चदरम्यान एकादशी सप्ताहात भजन व ‘न्यायाघरी अन्याय’ नाट्यप्रयोग रंगणार आहे.
१ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह ‘कालिका अवतार’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार असून २ एप्रिल रोजी आरती व तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page