नांदगाव पावाचीवाडी येथे भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक; प्रवाशी जखमी…

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव पावाचीवाडी बसस्टॉप नजीक भरधाव कारची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसून अपघात घडला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी सुमारे २:०० वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कार मुंबईच्या दिशेने जात असताना नांदगाव पावाचीवाडी परिसरात आली. त्याचवेळी महामार्गालगत जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने एका ट्रॅक्टरला त्या ठिकाणी थांबावे लागले होते. दरम्यान, भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट ट्रॅक्टरवर आदळली. धडकेनंतर कार कणकवलीकडे जाणाऱ्या लेनच्या मध्यभागी जाऊन थांबली.

या अपघातात कारमधील प्रवाशी जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलविण्यात आले.

दरम्यान, हा अपघात प्रत्यक्षदर्शींकडून समजला असून नेमका अपघात कसा घडला याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच, उशिरापर्यंत या अपघाताची पोलिसात नोंद झालेली नव्हती.

You cannot copy content of this page