इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड परीक्षेत शौर्य मांजरेकर राज्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२१: इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातील प्रि. एम. आर. देसाई स्कूलमधील इयत्ता ६ वीतील विद्यार्थी शौर्य शामल शंकर मांजरेकर याने विज्ञान विषयात राज्यात प्रथम (1) क्रमांक मिळवत देशात ६ वा क्रमांक पटकाविला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला स्कॉलरशिपही प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशामागे त्याची जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम तसेच पालक व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे.या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर यांनी त्याचा सत्कार करून गुणगौरव केला. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, शौर्यने यापूर्वी इयत्ता ५ वीमध्ये शिष्यवृत्ती मिळविली असून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकाविले आहेत.

फोटो

You cannot copy content of this page