सरपंच उदय गोवेकर ;
वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर..
⚡वेंगुर्ला ता.१३-: आज शुक्रवार १३ मार्च २०२६ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत दाभोली मध्ये खास महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सदर ग्रामसभेमध्ये दाभोली गावात एकजुटीने व एकमताने “दारुबंदीसाठी” ठराव घेण्यात आला. दारुबंदीसाठी लवकरात लवकर उपायोजना कराव्यात यासाठी सदर ठराव घेण्यात आला. सदर सभेस सरपंच उदय गोवेकर यांच्यासह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.त्यानंतर
दाभोली गावातील अवैध घंदे [दारूबंदी] बंद होणेबाबत महिलांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरपंच उदय गोवेकर, ग्रा. पं. सदस्य एकनाथ राऊळ,ग्रामसंघ महिला, तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले.
दाभोली गावामध्ये सऱ्हास गेली कित्येक वर्ष अवैध दारूविक्री चालू आहे, सदर दारुमुळे बरीच कुटुंब उद्ध्वस्त झालीत तसेच युवा पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे.
दारूबंदी बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
आपणाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ स्तरावर दाद मागण्यात येईल, तसेच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
