सभापती सुस्मिता जाधव:शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार..
सावंतवाडी : सभापती पदाच्या कार्यकाळात पंचायत समितीची मंजूर इमारत पूर्णत्वास आणणार तसेच विधायक काम करणार अशी ग्वाही नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांनी दिली. तर शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न राहील असं मत उपसभापती गौरव मुळीक यांनी व्यक्त केले. सभापती उपसभापती निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सभापती सुस्मिता जाधव म्हणाल्या, मला संधी दिली त्याबद्दल मी वरिष्ठांचे आभार मानते. सभापती पदाच्या या कार्यकाळात जनहिताची काम करण्यावर आपला भर राहील. तसेच प्रशासनाची होणारी गैरसोय बघता मंजूर इमारत माझा कार्यकाळ संपण्यापूर्वी पुर्णत्वास आणू असा विश्वास व्यक्त केला. तर, उपसभापती श्री. मुळीक म्हणाले, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न राहील. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर यांना अभिप्रेत काम आम्ही करणार आहोत. मला कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना मला संधी दिली. हे केवळ भाजपातच होऊ शकत. पुढच्या चार महिन्यांत तुम्हाला चांगला कारभार दिसून येईल तसेच पहिल्या बैठकीत इमारतीचा विषय आम्ही घेणार आहोत अशी माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
