⚡वेंगुर्ला ता.२६-: शासनाच्या आदेशान्वये निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण अंतर्गत
77 व्या प्रजासत्ताक दिनी निवती पोलीस ठाणे मार्फत निवती रॉक येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यामध्ये निवती मेढा गावातील 60 ते 65 बोटी घेऊन ध्वजास वंदन करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान निवती मेढा गावचे मच्छिमार श्रीधर मेतर यांना देण्यात आला. नमूद वेळी निवती पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी सलामी दिली. सदर वेळी कोस्ट गार्ड, फिशरीज, आणि मेरिटाईन आणि निवती मेढा गावचे नागरिक उपस्थित होते.यामध्ये फिशरीजचे अक्षय वाघ,
मेरीटाईनचे भाऊ नार्वेकर
कोस्ट गार्डचे श्री.गुप्ता, श्री.चौहान, निवती पोलीस स्थानकाचे अंमलदार शाम मांजरेकर, रामदास गोसावी, महेश कदम, सचिन कुंभार,पूजा पालयेकर आदी उपस्थित होते. 26 जानेवारी 2025 मध्ये निवती पोलीस स्थानकामार्फत नियीजनात्मक राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॉफी टेबल बुक मध्ये याचा समावेश झाला आहे.
२०२५ मधे निर्मनुष्य बेटांवर करण्यात आलेल्या ध्वजारोहणावर आधारित कॉफी टेबल बुक चे केंद्र शासनातर्फे प्रकाशन करण्यात आले. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती पोलिस स्टेशन मधील निवती रॉक येथील ध्वजारोहणाचा समावेश करण्यात आला.
शासनाच्या आदेशान्वये निवती पोलीस ठाणे मार्फत निवती रॉक येथे ध्वजारोहण…
