⚡सावंतवाडी, ता. २६-:
भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालय, सावंतवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. सुभाष रामचंद्र राऊळ यांची आंबोली मंडल कार्यकारिणीच्या संघटनात्मक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक श्री. महेशजी सारंग, आंबोली मंडल कार्यकारिणी अध्यक्ष श्री. संतोषजी राऊळ, जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य श्री. मंदारजी कल्याणकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष श्री. दिपक गवस, दोडामार्ग शहर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. चेतन चव्हाण, बांदा मंडल सरचिटणीस श्री. नारायण कांबळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर उपस्थित मान्यवरांनी श्री. सुभाष राऊळ यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
