आरोंदा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…

⚡सावंतवाडी ता.२३-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत महात्मा गांधी वाचनालय आरोंदातर्फे केंद्रशाळा आरोंदा नं.१ येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात व्यासपीठावरून मराठी भाषेबद्दल विचार व्यक्त करताना कार्यवाह मनोहर आरोंदेकर यांनी महात्मा गांधी वाचनालय आरोंदामध्ये पुस्तके तीस हजार पेक्षा अधिक असून ज्ञानसमृद्ध करण्यासाठी वाचनालयात यावे तसेच वाचनाने आपली बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. मोबाईल हे शारीरिकदृष्टीने घातक असून त्याचा परिणाम डोळ्यांवर होणार आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये जास्त वेळ न देता वाचनात वेळ जास्त घालवावा असेही आपले मत मांडले. मराठी भाषेची गोडवी गावी तितकी कमीच आहे. आपल्याला मिळतील ती पुस्तके वाचन करा. मराठी भाषा ही ज्ञानाची गोडी लावणारी भाषा आहे असे सांगितले. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल चेतन आरोस्कर वाचनालय कर्मचारी, आरोंदा शाळेचे शिक्षकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गणपत गावडे यांनी केले तर आभार निंगोजी कोकितकर यांनी मानले.

You cannot copy content of this page