प्रजासत्ताक मुख्य सोहळ्या दिनी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित…

दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य..

⚡सावंतवाडी ता.२३-: पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय ,भारत सरकार कडून दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्या साठी विशेष अतिथी म्हणून आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र मधून सोळा जिल्ह्यातील १६ सरपंच यासाठी निमंत्रित करण्यात आलेआहेत .त्यांच्या सोबत महाराष्ट्र पंचायत राज विभाग चे दोन नोडल अधिकारी सोबत असणार असून ,त्यांचे दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी नवीन महाराष्ट्र सदन येथे वास्तव्य असून
२५ जानेवारी सकाळी पंतप्रधान संग्रहालय येथे भेट . त्यानंतर
२५ जानेवारी सायंकाळी ७:०० वाजता पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय कडून “ग्राम सर्वोदय मासिकाचे” प्रकाशन
त्यानंतर देशपातळीवरील स्पर्धेची पारितोषिक वितरण कार्यक्रम सन्माननीय पंचायत राज केंद्रीय मंत्री यांचे कडून होणार आहे.
२६ जानेवारीला कर्तव्य पथ ,दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यास उपस्थिती असा नियोजित कार्यक्रम होणार असून ,सौदागर यांना निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page