पाळणेकोंड गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी…

दिलीप भालेकर व दिपाली भालेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न: भाविकांची दर्शनासाठी गर्दी..

⚡सावंतवाडी ता.२२-: पाळणेकोंड येथील श्री गणपती मंदिरात आज माघी गणेश जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर व नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली.

माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दुपारनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने पाळणेकोंड परिसरात धार्मिक व उत्सवमय वातावरण अनुभवायला मिळाले.

You cannot copy content of this page