विद्या विकास हायस्कूल आरोस चा स्तुत्य उपक्रम…

महिलांसाठी हळदी कुंकू समारंभा बरोबरच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.२०-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल प्रशालेत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाबरोबरच हळदी कुंकू समारंभसाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या नेत्र शिबिरासाठी कोंडूरे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली.यावेळी प्रथम दीपप्रज्वलन ,सरस्वती देवी, सावित्रीबाई फुले प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून किशोरी मडूरकर , नेत्र तपासणी डॉ.दीपाली कदम,शिक्षिका देवयानी चव्हाण,श्रद्धा मुळीक,मिताली नाईक,कृपा नेमळेकर तसेच प्रशालेचे माता पालक संघ,शिक्षक पालक संघ, विद्यार्थिनीं ,गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी नेत्र तपासणी डॉक्टर दीपाली कदम यांनी उपस्थित महिलांना डोळ्याबाबत माहिती देत,डोळ्यांचे आरोग्य कसे चांगले राहील, याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच नॅब नेत्र रुग्णालय कडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबतही मार्गदर्शन केले.

प्रशालेच्या शिक्षिका देवयानी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हाती आहे.आपल्या शरीराच्या आरोग्याबाबत आपण नेहमी सतर्क राहिली पाहिजे तसेच नेत्र तपासणी शिबिर आयोजनात सहकार्य करणाऱ्या अर्जुन मुळीक यांचे त्यांनी आभार मानून नेत्र तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घेण्यास सांगितले.

उपस्थित सर्व महिलांना प्रशालेच्या वतीने हळदी कुंकू तसेच वाण देण्यात आले.

सावंतवाडी भटवाडी येथील नॅब नेत्र रुग्णालय तर्फे उपस्थित महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली.यावेळी नॅब चे डॉ.संतोष कदम, डॉ.रुपाली कदम,सहाय्यक प्रज्ञा शेवाळे,कर्मचारी संजय परब यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रद्धा मुळीक, प्रस्तावना देवयानी चव्हाण तर आभार मिताली नाईक यांनी मानले.

You cannot copy content of this page