मेढा येथील जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन ; विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१९-:
मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापनदिन सोहळा दि. १९ ते २३ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजता नांदी व सुश्राव्य गायन, सायंकाळी ६ ते ७.३० वा. गणेश आरती स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा मालवण तालुक्यातील शाळांसाठी असून पहिला गट इयत्ता ५ वी ते ७ वी, दुसरा गट इयत्ता ८ वी ते १० वी असा आहे. मंगळवार २० रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वा. गणेश आरती स्पर्धेतील खुल्या गटाची स्पर्धा, रात्री ९ वाजता श्री देवी भुमिका दशावतार कोकणनाट्य मंडळ, मळगाव यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. बुधवार २१ रोजी सायंकाळी मालवण शहर मर्यादित महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा, रात्री ८ ते १० वाजेपर्यंत खुली अभंग गायन स्पर्धा, गुरुवार २२ रोजी सकाळी १० वाजता श्री गणेशजन्माचे कीर्तन-किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर जोशी घानोरकर, पुणे यांचे होणार आहे. यासाठी साथसंगत ऑर्गन-भालचंद्र केळुसकर, तबला-पंकज पाटील, पखवाज-विशाल केळुसकर करणार आहेत. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री ९ वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार, २३ रोजी सायंकाळी ६ वाजता भालचंद्र सोहम, कुडाळ यांचे भजन, रात्री ८.३० वाजता श्री भुतनाथ प्रासादिक भजन मंडळ वायरी-भुतनाथ बुवा भालचंद्र केळुसकर यांचे भजन होणार आहे. सर्वांनी वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page