⚡बांदा ता.१८-: बांदा- देऊळवाडी येथील खेमराज प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सान्वी संतोष सावंत (वय ४६) यांचे आज शनिवारी रोजी सकाळी ७.१५ वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. आज दुपारी येथील मोर्ये स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बांदा येथील प्रसिद्ध वास्तूविशारद संतोष विनायक सावंत यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, आई असा परिवार आहे.
बांदा येथील खेमराज प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सान्वी सावंत यांचे निधन…
