Headlines

नट वाचनालयात हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१४-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात अंकुश रामचंद्र मांजगावकर पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता नट वाचनालयात होणार आहे.
सदर स्पर्धा ही सावंतवाडी तालुक्यामधील शाळांपुरती मर्यादित असून ती इयत्ता ४ थी व ५ वी तसेच इयत्ता ६ वी व ७ वी अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटात एका शाळेतील फक्त पाच विद्यार्थ्यांना सहभागाची संधी दिली जाणार आहे.
हस्ताक्षर लेखनासाठी आवश्यक कागद वाचनालयामार्फत पुरविण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी स्वतः लेखन साहित्य सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षर, वाचनाची आवड तसेच मराठी भाषेप्रती गोडी निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या हस्ताक्षर स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नट वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page