निरवडेत १८ जानेवारीला अनिल निरवडेकर यांचा होणार नागरी सत्कार…

संजय तानावडे आणि साईनाथ तानावडे यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा…

⚡​सावंतवाडी, ता. १४:-:
येथील शहराच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल निरवडेकर यांच्यावर सध्या सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर निरवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे आणि साटम महाराज मेडिकलचे सर्वेसर्वा साईनाथ तानावडे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
​याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना संजय तानावडे म्हणाले की, श्री. निरवडेकर हे मूळचे निरवडे गावचे रहिवासी असून आज ते सावंतवाडी शहराच्या उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत, ही संपूर्ण गावासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या रूपाने एक कार्यक्षम नेतृत्व शहराला मिळाले असून, त्यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील नागरिकांची उत्तम सेवा घडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
​या भेटीदरम्यान आगामी १८ जानेवारी रोजी निरवडे गावाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष गौरव सोहळ्याचे निमंत्रणही तानावडे यांनी दिले. भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल पियुष बर्डे आणि वेदांत पारकर यांचा या कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात येणार असून याच सोहळ्यात नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे. या निमंत्रणाचा स्वीकार करत श्री. निरवडेकर यांनी कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page