खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४- :
खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी खाकीलवाडा परिसरातील विकासकामांबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही तसेच येथील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असा शब्द नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी दिला.
तसेच उपस्थित नागरिकांना त्यांनी नवीन वर्ष व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

You cannot copy content of this page