आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात मनिष दळवी यांचा विकासकामांचा धडाका…

वेंगुर्ला वायंगणी गावातील ११ विकासकामांसाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर..

⚡वेंगुर्ला ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच वायंगणी ग्रामपंचायत सरपंच अवी दुतोंडकर, उपसरपंच रवींद्र धोंड व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे वायंगणी गावाच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे.
वायंगणी गावातील ११ विकासकामांसाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जिल्हा बँके अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना मा. दळवी साहेब यांनी “वायंगणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपची साथ सदैव राहील” असा विश्वास व्यक्त केला. या भूमिपूजन कार्यक्रमास वायंगणी ग्रामपंचायतचे सरपंच अवी दुतोंडकर, उपसरपंच रवींद्र धोंड, सदस्य विनू मठकर, अनंत केळजी, महेश मुननकर, सविता परब, विद्या गोवेकर, विद्या कांबळी, राखी धोंड, नांदोस्कर, भाजप पदाधिकारी प्रशांत खानोलकर, माजी उपसरपंच हर्षद साळगावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, आबा धोंड, तसेच मोठ्या संख्येने वायंगणी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.“येणाऱ्या तीन वर्षांमध्ये वायंगणी गावाचा विकासात्मक कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट भाजपच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास वायंगणी ग्रामपंचायत सरपंच अवी दुतोंडकर यांनी व्यक्त केला.” विकासकामांमुळे वायंगणी गावाच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे, असे यावेळी सरपंच अवि दुतोंडकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page