⚡सावंतवाडी ता.१०-: उद्या रविवार ११ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली व नगरपरिषद, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ०७.०० वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षीस वितरण समारंभ सकाळी ०९.३० वाजता होणार आहे आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन आंबोली सैनिक स्कूल व नगरपरिषद यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सैनिक स्कूल आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे उद्या मॅरेथॉन स्पर्धा…
