⚡सावंतवाडी ता.१०-: सातार्डा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूलला शालेय पोषण आहार योजनेकरीता नरेश वसंत मांजरेकर यांनी आपले आई वडील कै. सौ. वासंती वसंत मांजरेकर व कै. श्री. वसंत दत्ताराम मांजरेकर यांच्या स्मरणार्थ भांडी भेट दिली.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक मोठी समई देणगी स्वरूपात दिली .
नरेश मांजरेकर यांनी वस्तूरुपी देणगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत शालेय समिती अध्यक्ष नारायण हळदणकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली.
शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या या बहुमूल्य देणगीसाठी नरेश वसंत मांजरेकर यांचे शाळा व संस्था यांचेकडून मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच विद्यार्थी विकासासाठी कायमच सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ शंकर कवठणकर यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाल्याचे प्रशालेच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी रघुनाथ कवठणकर यांचे देखील शाळा व संस्थेच्या वतीने मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
सातार्डा हायस्कूलला नरेश मांजरेकर यांच्या कडून शालेय पोषण आहार साठी भांडी सुपूर्द…
