शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई जपताहेत सामाजिक बांधिलकी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: सन १९८५ पासून परुळ्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या परुळे युवक कला क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेस वेंगुर्ला तालुका शिवसेना प्र. तालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सचिन देसाई यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीची dimmer power pack मशीन देण्यात आली. या मंडळाकडून दरवर्षी स्व.ऍड.अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्ष हे या स्पर्धेचे ३५ वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी प्रकाश योजनेकरिता या मशीनची आवश्यकता होती. ही गरज ओळखून मंडळाच्या विनंतीस मान देऊन सचिन देसाई यांनी त्यांचे वडील कै. दामोदर तथा नाना देसाई यांच्या स्मरणार्थ ही मशीन दिली आहे. स्वरवसंत गायन स्पर्धेच्या निमित्ताने ही मशीन मान्यवरांच्या उपस्थितीत सचिन देसाई यांनी मंडळाकडे सुपूर्द केली.सचिन देसाई हे गेल्या अनेक वर्षांपासून या एकांकिका स्पर्धेचे बक्षीस दाते आहेत. याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page