महिलांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाची जाणीव ठेवून प्रगती साधावी…

सिध्दाली गावडे ; चौके ग्रामपंचायतीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

⚡मालवण,ता.०८-:
प्रतिकूल परिस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरताना दिसत आहेत याचे सर्व श्रेय सावित्रीबाईंच्या संघर्षाला जाते. याची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ आशा स्वयंसेविका सिध्दाली गावडे यांनी चौके येथे केले.
चौके ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. प्रारंभी सरपंच पी. के. चौकेकर यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, विशाखा चौकेकर, अंगणवाडी सेविका सौ. सुकाळी, लिपिक सुविधा गावडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा दिला व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर यांनी केले. त्यांनी सावित्रीबाईंच्या शैक्षणिक क्रांतीचा थोडक्यात आढावा घेत सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सुहासिनी परब, केंद्र संचालिका मेघा वराडकर, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद सावंत, गुरुप्रसाद गावडे, विनित आंबेरकर, श्री. गावडे यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page