⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री पटकीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव ( उद्या ) शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी देवीची विधिवत पूजा व धार्मिक विधी पार पडणार असून दुपारी ३ वाजल्यापासून सुवासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. या जत्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
श्री पटकीदेवीच्या दर्शनासाठी व जत्रोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थ व देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
