⚡सावंतवाडी ता.०७-: येथील समाज मंदिरासमोर चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात रात्री पावणेआठच्या सुमारास घडला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
