संजू परब मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

प्रभाग ४८ मध्ये उमेदवार सलमा सलीम अलमेलकर यांच्या प्रचारात सहभाग; मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या माध्यमातून झालेली विकास कामांची दिली माहिती..

⚡सावंतवाडी ता.०७-:
शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब हे सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले असून त्यांनी आज मुंबईतील प्रभाग क्रमांक ४८ मध्ये महायुतीच्या वतीने शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सलमा सलीम अलमेलकर यांच्या प्रचारात सहभाग घेतला.

यावेळी संजू परब यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधला. महायुतीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत मुंबईत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. तसेच विकासाची ही घडी पुढे नेण्यासाठी उमेदवार सलमा सलीम अलमेलकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संजू परब हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून शहरातील विविध प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांच्या या प्रचार दौर्‍याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page