⚡कणकवली ता.११-:
साळीस्ते – कांजीरवाडी येथील शिवराम गोपाळ चव्हाण (७३) हे बुधवार, १० डिसेंबरला दुपारी ३ वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांचा मुलगा दिनेश शिवराम चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. शिवराम यांची उंची ५.३ फुट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहरा उभट, केस पिकलेले, मिशी सफेद व बारीक, अंगात उभ्या रेषांचे सफेद शर्ट व काळी फुल पॅंट, डोळ्यावर चष्मा आहे. अशा वर्णनाचा वृद्ध आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.
साळीस्ते येथील वृद्ध बेपत्ता…
