मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी ट्रस्टकडून लोकवर्गणी..
⚡कुडाळ ता.११-: सद्गगुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी ग्राम पंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंगुळी गावाचे संत प. पू. राऊळ महाराज यांचा मठ प. पू. विनायक अण्णा महाराज, पिंगुळी यांनी बांधला. याच्या व्यवस्थापनेसाठी राऊळ महाराजांचे भक्तांना एकत्रित करून सद्गगुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी या नावाने ट्रस्टची स्थापना केली. या संस्थान मार्फत अन्नदान केले जाते. तसेच संस्कृतिक, आरोग्य, सामाजिक उपक्रम मोठ्याप्रमाणात साजरे केले जातात. शासनाच्या ब क्षेत्र पर्यटन स्थळात याचे स्थान आहे. पिंगुळी गावातील हे एक महत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या संस्थांचा पिंगुळी गावाच्या विकासात नेहमीच सहकार्य असते.
या वर्षी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत पिंगुळी ग्रामपंचायतीने भाग घेतला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंच पिंगुळी यांनी सद्गुरु राऊळ महाराज संस्थान पिंगुळी यांना लोकवर्गणी स्वरुपात आर्थिक सहाय्य करण्याची विनंती केली. या विनंतीस मान देऊन सदगुरु राऊळ महाराज संस्थांन च्या विश्वस्त मंडळाने या अभियानास रु. २ लक्ष रुपयाचा धनादेश लोकवर्गणी म्हणून सरपंच ग्रामपंचायत पिंगुळी यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी संस्थानचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ, उपकार्याध्यक्ष दशरथ राऊळ, कोशाध्यक्ष शंकर तेजम, सचिव सुनील फणसेकर, विश्वस्त अशोक कदम, महादेव पांगे, विनय पाटील, गिरीधर राऊळ, प्रदीप आमोणकर, राजन पांचाळ, महेश धुरी आणि महेंद्र कुडकर, गुरूंनाथ धुरी, शिवराम (अजित) राऊळ, बाळ कालेकर, संदीप नलावडे, मोहन मोरे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतचे सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच मंगेश मसके, ग्रा प. सदस्य केशव पिंगूळकर, महेश पालकर, सौ. नूतन गावडे, सौ. ममता राऊळ ग्रामविकास अधिकारी आर. टि. निवतकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि भाविक भक्त उपस्थित होते.
