⚡दोडामार्ग ता.०९-: बनावट दस्त तयार करून बेकायदेशीर मार्गाने जमीन व्यवहार केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी अनिल कृष्णा निरोडेकर, अँड सोनू ए.गवस,अँड दत्तप्रसाद ठाकूर,अँड गणेश चव्हाण,अँड प्रितेश गवस, अँड केतन जाधव, अँड वामन गवस, यांनी काम पाहिले.
या प्रकरणात गोरीशा सुधाकर टोपले, परेश रमेश परब, संजय अंमृकुम गावडे व मोहन विट्ठल गावड यांच्यासह सहा जणांवर आरोप करण्यात आले होते.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु तपास व न्यायालयीन सुनावणीत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून सर्व आरोपी निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले.
