⚡मालवण ता.०८-: किल्ले निवती येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यावरील महादरवाजाची स्वच्छता करण्यात आली. झाडी झुडपांनी झाकोळलेला दरवाजा मोकळा करण्यात आला आहे.
किल्ले निवतीवर दरवर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता तसेच संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही ही मोहीम राबवून निवती किल्ला स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत स्वप्निल साळसकर, ज्ञानेश्वर राणे, यतिन सावंत, प्रसाद पेंडूरकर, साईप्रसाद मसगे, हेमलता जाधव, समिल नाईक, गणेश नाईक यांनी सहभाग घेतला.
