⚡बांदा ता.०५-: वाफोली येथे एका खासगी दुरसंचार कंपनीकडून भर वस्तीत विनापारवाना उभारण्यात येणाऱ्या मोबाईल मनोऱ्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनी बंद केले आहे. यावेळी ग्रामपंचायतने कंपनीला ना हरकत दाखला दिला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आमचा मनोऱ्याला विरोध नसून तो भर वस्तीत न उभारता अन्यात्र वस्तीपासून दूर उभरावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत स्थानिकांनी जिल्हाधिकारी, सावंतवाडी तहसीलदार व बांदा तलाठी यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे.
कंपनीने मनोरा उभारताना स्थानिक प्रशासनाला कोणतीही कल्पना दिली नाही अथवा लेखी परवानगानी देखिक घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनोरा उभारण्याचा कुठलाही प्रस्ताव आमच्या जवळ आलेला नाही अथवा पत्रव्यवहार झालेला नाही असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने सविस्तर चौकशी केली असता हा मनोरा (टॉवर) सर्वे क्रमांक २२१ मध्ये उभारण्यात येत आहे. परंतु त्या जागेबाबत कोणतीही कागदपत्रे, संबंधित जागा मालकाचे संमतीपत्र, भाडेकरार,जागा अकृषीत (NA) वापराबाबत प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक असणारी कोणतेही कागदपत्रे सादर न करता कामास सुरवात केली होती.
तसेच वाफोली ग्रामपंचायत हद्दीत मनोरा (टॉवर) मंजूर झाल्याबाबत कोणतेही दस्तऐवज अर्जासोबत दिसून येत नाहीत. वाफोली गावात मनोरा (टॉवर) मंजूर झाल्यास कोणत्या ठिकाणी मनोरा (टॉवर) बांधण्यात येणार याबाबत कोणतीही कल्पना संबंधित विभागाकडून अथवा कंपनीकडून व जमीन मालकाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आलेली नाही. असेही ग्रामंचायतीने संपन्न झालेल्या विशेष सभेत नागरिकांना माहिती देताना सांगितले आहे.
याचाच अर्थ असा की ही कंपनी कोणतीही परवानगी न घेता आपला मनमानी कारभार चालवत गावच्या मधोमध हा मनोरा(टॉवर) उभारण्याचा प्रयत्न करत होती.हे गावातील नागरिकांच्या निदर्शनास येताच गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की हा मनोरा (टॉवर) गावाच्या मधोमध असल्याने गावातील जनतेच्या जीवाला भविष्यात अती रेडिएशन मुळे धोका निर्माण होऊ शकतो तसेच तेथील फळबागांना त्याचा फटका बसू शकतो.त्यामुळे गावातील जनतेने हा मनोऱ्याला(टॉवर)तीव्र विरोध केला आहे.गावातील नागरिकांचं म्हणणे आहे की आमचा मनोरा उभारण्यास (टॉवर) विरोध नाही, मात्र गावात अशा सुविधा पाहिजेतच पण लोकांच्या जीवाशी खेळून असे जर का प्रकल्प येत असतील तर अशा प्रकल्पांना आमचा तीव्र विरोध असेल असे प्रकल्प गावच्या वेशीवर किंवा निर्जन स्थळी असावेत.
वाफोलीत विनापरवाना मोबाईल टॉवर उभारणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध…
