⚡सावंतवाडी ता.०३-: प्रतीवर्षाप्रमाणे मळगाव आजगावकर- गोसावीवाडी येथील दत्त मंदिर येथे उद्या ०४ डिसेंबर रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
पहाटे ५.३० वाजल्यापासून अखंड नामस्मरण, सकाळी १० वाजता षोडशोपचार महापूजा, दुपारी ३ वाजता ह. भ. प. श्री मुंडले बुवा यांचे सुश्राव्य किर्तन
सायं. ६ वाजता दत्तजन्म सोहळा, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा आदी कार्यक्रम होणार आहेत. ५ डिसेंबर रोजी सकाळी महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. मळगाव तसेच परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मळगाव आजगावकर- गोसावीवाडी येथील दत्त मंदिर येथे उद्या दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन…
