भव्य मोटरसायकल रॅलीने उबाठा शिवसेनेचे मालवणात जोरदार शक्तीप्रदर्शन…

⚡मालवण ता.३०-:
छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी जय शिवाजी… कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणा देत… भगवे झेंडे फडकवत… आज मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेतर्फे मालवण शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत काढलेल्या रॅलीत बहुसंख्य शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

मालवणी उबाठा शिवसेना शाखा कार्यालय येथून या मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट येथून कचेरी मार्गे टोपीवाला हायस्कुल ते धुरीवाडा, रेवतळे सागरी महामार्ग ते देऊळवाडा, त्यानंतर आडवण मार्गे वायरी, दांडी ते पुन्हा शाखा कार्यालय अशी ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. पूर्ण शहरात फेरी काढत नगरपालिका निवडणुकीत मतदारांना उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर, नितीन वाळके, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, उमेश मांजरेकर, राजा शंकरदास, दिपा शिंदे, निनाक्षी मेतर, रश्मी परुळेकर, उमेश चव्हाण, तपस्वी मयेकर, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, माधुरी प्रभू, गौरी मयेकर, तेजस नेवगी, अनिता गिरकर, नंदू गवंडी, राधिका मोंडकर, निलेश दुधवडकर, मनोज मोंडकर तसेच काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, महेश अंधारी, मेघनाद धुरी, संदेश कोयंडे, ऍड. अमृता मोंडकर, ऍड. सुमित जाधव, आपा चव्हाण आदी व इतर बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page