⚡मालवण ता.३०-: मालवण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचा मालवण शहरातील सर्वच प्रभागात जोरदार प्रचार सुरू असून प्रभाग दहा येथे शिवसेनेचे उमेदवार सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर यांच्या प्रचारार्थ प्रभागात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्स्फूर्त प्रचार फेरी काढण्यात आली.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात विकासाचे व्हिजन घेऊन शिवसेना उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांसह सर्व नगरसेवक उमेदवार बहुमताने विजयी होतील. शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रचार रॅली दरम्यान व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गांवकर, सूर्यकांत फणसेकर, संदेश चव्हाण, मंदार लुडबे यांसह शिवसेना पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
