सावंतवाडीची जनता सुज्ञ,ते कोणत्याही आमिषाना बळी पडणार नाही…

आशिष सुभेदार:जनतेला पैसे देऊन विकत घेऊ पाहणारे उद्या विकास काय करतील…?

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीला दोन दिवस उरले असताना शहरात सत्तेतील राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैश्यांचे वाटप होत आहे, सावंतवाडीची जनता सुज्ञ आहे ती कोणत्याही आमिषाना बळी पडणार नाही येथील जनता विकासाच्याच बाजूने राहील. जनतेला पैसे देऊन विकत घेऊ पाहणारे उद्या विकास काय करतील अशी टीका उद्धव ठाकरे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे युवा तालुका प्रमुख व सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी केली आहे.
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शहरात सत्तेतील राजकीय पक्षांकडून जोरदार पैश्यांचे वाटप सुरू आहे. मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत. फक्त जनतेची मते मिळविण्यासाठी त्या राजकीय पक्षांचा खटाटोप सुरू असून पैसे वाटणारे हे राजकीय पक्ष उद्या जनतेला लुटतील त्यांच्या मोक्याच्या असलेल्या जमिनीवर त्यांचा डोळा आहे याचे भान सावंतवाडीच्या जनतेने ठेवावे असे सुभेदार म्हणाले. या शहराची जनता सुसंस्कृत उच्च शिक्षित आहे. त्याना विकास कोण करणार हे चांगलेच माहीत आहे. मतांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे देणारे हे राजकीय पक्ष शहराचा कोणताही विकास करणार नाहीत पाणी पट्टी, घर पट्टी, ठेकेदार व सर्व कामांमध्ये टक्केवारी मागून ते निवडणुकीत दिलेले पैसे वसूल करतील. ही डोकेदुखी जनतेला निश्चितच सहन करावी लागेल त्यामुळे जनतेने कोणत्याही प्रकारच्या अमिषाना बळी पडू नये असे उबाठा प्रवक्ते सुभेदार यांनी सांगत, आता पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे पुढील पाच वर्षे तुमची पिळवणूक नक्की आहे हे ध्यानात ठेवून उबाठा पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवाराना निवडून द्यावे असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page