प्रभाग तीनमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेश चव्हाण यांचा प्रचार जोरात…

⚡मालवण ता.२९-: मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग तीन मधून उबाठा शिवसेनेचे उमेश अरविंद चव्हाण हे तरुण उमेदवार नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असून त्यांच्याकडून प्रभागात जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रभागातील आपण स्थानिक उमेदवार असल्याने प्रभागातील समस्यांची आपणास चांगली जाण आहे. त्यामुळे मतदारांनी एक तरुण व सुशिक्षित उमेदवार म्हणून आपणास नगरसेवक पदी निवडून दिल्यास यां प्रभागातील समस्या सोडविण्याबरोबरच विकास साधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे उमेश चव्हाण यांनी सांगितले.

मालवण शहरातील प्रभाग तीन मध्ये देऊळवाडा परिसर येतो. येथून उबाठा शिवसेनेतर्फे उमेश चव्हाण यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेश चव्हाण यांचा प्रभागात चांगला संपर्क आहे. यामध्ये प्रामुख्याने युवा व तरुण वर्गाशी त्यांचा चांगला संपर्क आहे. एक उत्तम आंबा व्यावसायिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. उमेश चव्हाण हे गेली काही वर्षे उबाठा शिवसेनेत युवासेनेचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच प्रभागातील विविध प्रश्न व समस्यांबाबत सातत्याने आवाज उठवत त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्रभाग तीन मधील उबाठा शिवसेनेच्या महिला उमेदवार सौ. योगिता गांवकर व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजा करलकर यांच्यासमवेत प्रभागात प्रचार मोहीम राबविताना घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी आपण घेत असून उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे उमेश चव्हाण यांनी सांगितले. स्थानिक व तरुण उमेदवार म्हणून मतदारांनी मला नगरसेवक म्हणून संधी द्यावी, असेही उमेश चव्हाण म्हणाले.

You cannot copy content of this page