सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलची यंदाची दहावी आवृत्ती..
कुडाळ : दक्षिण आशियातील सर्वात मोठा बहुविध कलांचा महोत्सव सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल या वर्षी पुन्हा पणजीत परतत आहे. १२ ते २१ डिसेंबर दरम्यान, मांडवी नदीकाठच्या ठिकाणी आणि इतर सार्वजनिक स्थळी विविध प्रकारच्या कलाप्रदर्शन, कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
गेल्या दहा वर्षांत एसएएफ हा केवळ महोत्सव न राहता, भारत आणि जगभरातील कलाकारआणि प्रेक्षकांना एकत्र आणणारा मोठा सांस्कृतिक मंच बनला आहे. या वर्षी गोव्यात परतण्यापूर्वी हा महोत्सव बर्मिंगहॅम, अहमदाबाद, दिल्ली, वाराणसी, चेन्नई, गुरुग्राम, दुबई आणि पॅरिस अशा अनेक शहरांतगेला, जिथे एसएएफ च्या दहाव्या आवृत्तीची झलक दाखविणारे कार्यक्रम करण्यात आले.
पहिल्या आवृत्तीपासूनच ‘एक्सेसीबिलीटी’ म्हणजेच कला सर्वांसाठी खुली असावी हे एसएएफ चे प्रमुख ध्येय राहिले आहे. २०२५ मध्येही, कवी आणि कलाकार सलील चतुर्वेदी यांच्या क्यूरेशनखाली, ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. ओल्ड जीएमसी कंपाऊंडमधील एक्सेस व्हिलेज येथे विविध गरजांसाठी तयार केलेले अनुभवपूर्ण, संवेदनशील आणि सहभागी होणारे प्रकल्प आयोजित केले जात आहेत.
“संस्कृती ही प्रत्येकाची असली पाहिजे. कुणालाही बाहेर ठेवायचे नाही. एक्सेसीबिलीटी म्हणजे केवळ सोयी नाहीत, तर सन्मान आणिसहभाग आहे. दहा वर्षे पूर्ण करताना हीच भावना आम्हाला मार्गदर्शीत करते,” असे एसएएफ चे संस्थापक व संरक्षक सुनील कांत मुंजाल यांनी सांगितले.
सेन्टेड स्टोरीज: सुगंध आणि कथाकथन यांचा संगम असलेली अनोखी कार्यशाळा, हँड/आय: स्पर्शाच्या माध्यमातून ‘बघण्याचा’ अनुभव, ब्रिद + सावंड इमर्शन: श्वसन व ध्वनी-चिकित्सेचा ध्यानात्मक सत्र, स्टुडीयो मी: सर्वांसाठी खुली कला-जगात वावरू देणारी जागा, सोन्सरी रूम: न्यूरोडायव्हर्स आणि सामान्य प्रेक्षकांसाठी शांतता आणि स्थिरतेची जागा ह्या महत्त्वाच्या ‘एक्सेसीबिलीटी’ अनुभवांचा समावेश आहे
क्यूरेटर तनुल विकमशी यांची पेपर टू स्कल्पचर ही कार्यशाळा पुनर्वापर आणि सहकार्याने तयार करण्यावर भर देते. नेचर्स सिम्फनी: अ बर्डवॉचिंग एडवेन्चर हे अंध प्रेक्षकांसाठी तयार केलेले अनोखे पक्षीनिरीक्षण सत्र आहे.
तसेच दॅरफॉर आय एम: दिव्यांगत्वाशी संबंधित अनुभवांवर आधारित सात कलाकारांची प्रदर्शनी, सायलंट रिदम्स: भारतातील पहिल्या मूक-कलाकार गटाचे सादरीकरण, पोएम्स ऑन दि मूव्ह 2.0: शटल कॅबमध्ये थेट कविता वाचन, क्यूरेटेड बाय ठुकराल आणि टाग्रा आणि चतुर्वेदी ही कला आणि सादरीकरणे आहेत.
सिद्धांत शाह, एक्सेस फॉर ऑल, रोहन मराठे आणि शिवानी ढिल्लों यांच्या द लॅब मधील कार्यशाळा
मध्ये डियर नॉर्मल, सावंड ऑफ सायलंन्स, सेन्सरी स्टोरीटेलींग, पंचतंत्र स्टोरीज तसेंच सह विशेष कार्यक्रमांत सिनेमा फॉर एव्हरी सेन्स : हिंदी चित्रपटांचे ऑडिओ-वर्णन आणि पिलाटेज फ्लो पर्फोरमन्स बाय कायझन वेलनेस पहायला मिळतील.
एसएएफ संचालिका स्मृती राजगडिया म्हणतात, “एक्सेसीबिलीटू हे एसएएफ साठी फक्त ‘समावेशन’ नाही, तर कला अनुभवण्याच्या संकल्पनेला विस्तार देण्याचा मार्ग आहे. कोणत्याहीक्षमतेचा व्यक्ती कला अनुभवू शकला पाहिजे. आमच्या दहाव्या वर्षातही हेच आमचे केंद्रबिंदू आहे.”
महोत्सवाच्या सहसंरक्षिका शेफाली मुंजाल म्हणतात, “एसएएफ हा केवळ महोत्सव राहिलेला नाही; तो सर्जनशीलता आणि सामाजिकएकतेसाठीचा एक मोठा प्रवास आहे.”
सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल २०२५ साठी नोंदणी सुरू झाली आहे! तुमचा आर्ट पास बुक करण्यासाठी, कार्यशाळा व प्रदर्शनांची माहितीमिळवण्यासाठी https://www.serendipityartsfestival.com/register
ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
