पैशाच्या जीवावर जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना सावंतवाडीची जनता योग्य जागेवर बसवेल…

विनायक राऊत: ठाकरे शिवसेनेच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡ सावंतवाडी ता.२९-:
सावंतवाडी शहरात सध्या सुरू असलेल्या पैशाच्या जोरावरच्या राजकारणाला सावंतवाडीची सुज्ञ जनता योग्य जागेवर बसवेल, अशी तीव्र टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. कितीही पैसा वापरला तरी सावंतवाडीकर सुज्ञ असून, आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय मिळवून देतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान राऊत बोलत होते. या फेरीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

You cannot copy content of this page