प्रदेशाध्यक्ष-पालकमंत्र्यांच्या भेटीने मनोबल वाढले…

अँड. अनिल निरवडेकर: तीन तारखेला आमचा विजय निश्चित

⚡ सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी टीका-टिप्पणी न करता प्रत्येकाने आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. प्रभाग क्रमांक १० चे भाजप उमेदवार अँड. अनिल निरवडेकर यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांनी भेट देत विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी बोलताना अँड. निरवडेकर म्हणाले की, “आज दोन्ही मान्यवर नेते आमच्या घरी येऊन आमचे मनोबल वाढवून गेले. प्रचाराची कोणती यंत्रणा प्रभावी होईल याबाबत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यामुळे एक छोटा कार्यकर्ता म्हणून आम्हाला निश्चितच ऊर्जा व प्रेरणा मिळाली असून तीन तारखेला आमचा विजय निश्चित आहे.”

प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपकडून अँड. अनिल निरवडेकर व सौ. जाधव या उमेदवारांची जोडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आघाडीचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या बळावर “आमचा विजय अटळ आहे,” असा ठाम दावा निरवडेकर यांनी केला.

You cannot copy content of this page