“वेंगुर्ल्याच्या विकासासाठी पुन्हा भाजपलाच साथ द्या” …

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण: वेंगुर्ल्यात भाजपची सभा उत्साहात संपन्न..

वेंगुर्ले ता.२५-:
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून गरिबी हटवीण्याचे काम केले आहे
. आज केंद्रात, राज्यात भाजपाचे एकविचाराचे सरकार आहे. ज्याप्रमाणे आपण 2016 मध्ये भाजपला साथ देत वेंगुर्ल्यात विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा वेंगुर्लावासियांच्या आशीर्वादाची गरज असून भाजपला आपले अमूल्य मत द्या, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना.रवींद्र चव्हाण यांनी आज मंगळवारी वेंगुर्ला येथे जाहीर सभेत केले.
2 डिसेम्बर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. भाजपच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार प्रचारार्थ माणिक चौक येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. रवींद्र चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री ना. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवा नेते विशाल परब, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुकाध्यक्ष पप्पू परब, उमेदवार दिलीप गिरप, सुहास गवंडळकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राजू राऊळ,शरद चव्हाण, मंडळ अध्यक्षा सुजाता पडवळ,वसंत तांडेल, सुषमा प्रभुखानोलकर आदीसह उमेदवार उपस्थित होते.
पालकमंत्री ना. नितेश राणे, अतुल काळसेकर, दिलीप गिरप, सुषमा प्रभू खानोलकर, श्वेता कोरगावकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रशांत आपटे यांनी केले.यावेळी शहरासह तालुक्यातील सरपंच, विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page