⚡सावंतवाडी ता.२४-: ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मिलिंद मठकर यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नियाज शेख व क्षिप्रा सावंत यांचाही प्रचार केला.
शिरोडानाका भागात त्यांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद असून ठाकरे शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास सीमा मिलिंद मठकर यांनी व्यक्त केला.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
