आ. निलेश राणे:मालवण नगरपरिषद शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ..
⚡मालवण ता.२१-:
मालवण नगर परिषदेत शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर व सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले.
मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरात श्री देव दांडेश्वराला श्रीफळ अर्पण करून मालवण नगरपरिषद शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग 9 मध्ये करण्यात आला. शिवसेना प्रचार कार्यालयाचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर, नगरसेवक उमेदवार महेश कोयंडे, सौ. प्रमिला मोरजे, विधानसभा प्रमुख बबन शिंदे तसेच अनेक नागरिक उत्साहाने उपस्थित होते.
श्री देव दांडेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. स्थानिक मुद्दे, विकासाच्या संधी आणि आगामी निवडणुकीतील जनतेच्या अपेक्षा यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, नागरिक यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांसह नगरसेवक उमेदवार यांना प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागात सक्रियपणे प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतं आहे.
