⚡मालवण ता.२१-:
मालवण नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग ४ मधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सौ. पुनम चव्हाण व सिद्धार्थ जाधव यांनी मालवण एसटी स्टॅन्ड नजीकच्या श्रीराम मंदिरात श्री राम व श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन आणि गाऱ्हाणे घालून प्रचाराचा शुभारंभ केला. प्रभाग क्रमांक चार मधून आपल्यासह सिद्धार्थ जाधव आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर अशा शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस यश मिळेल, असा विश्वास यावेळी सौ. पूनम चव्हाण यांनी व्यक्त केला.
या प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, बबन शिंदे, महिला तालूकाप्रमुख मधुरा तुळसकर, नागेश चव्हाण, प्रियांका मेस्त्री, स्नेहा घाडीगावकर, आनंद मालवणकर, रश्मी तुळसकर आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पूनम चव्हाण म्हणाल्या, मालवण शहरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना देव यश देईल. मालवण शहर प्रभाग चार मधून शिंदे शिवसेनेतर्फे नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून आपण स्वतः व सिद्धार्थ जाधव हे निवडणूक लढवीत आहेत. आजपर्यंत यां प्रभागात काम करताना मी प्रत्येक कुटुंब व व्यक्तीच्या खंबीरपणे उभी राहिली आहे. लोकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास व प्रेम असेच सदोदित टिकवून ठेवण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे आपण काम करत राहू. या प्रभागात आपणास तसेच सिद्धार्थ जाधव आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर अशा तिन्ही उमेदवारांना भरघोस असे यश मिळेल, मालवण शहर विकासासाठी जनतेने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे यावेळी पूनम चव्हाण यांनी सांगितले.
तसेच लाडकी बहीण ही योजना चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या सुरु आहे. काम आणि संसार यापुरताच महिलांचा विचार केला जात होता. मात्र सरकारने त्या पलीकडे महिलांचा विचार करून त्यांना सबल करण्याच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना सुरु केली. महिलांनी धनुष्यबाण या चिन्हाशी एकनिष्ठ राहावे, लाडकी बहीण योजनेसाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महिलांच्या वतीने आम्ही आभार मानतो, असेही सौ. पूनम चव्हाण म्हणाल्या.
