⚡वेंगुर्ला ता.२१-: आरवली येथील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव वेतोबा मंदिराच्या वार्षिक जत्रेनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज मंदिरात उपस्थित राहून वेतोबाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व आवश्यकता जाणून घेतल्या.
यावेळी परब म्हणाले की, वेतोबा देवाच्या आशीर्वादाने कोकणवासीयांचे कल्याण आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमधून लोकांमध्ये मिसळण्याची परंपरा कायम ठेवत जनतेची सेवा करण्याचा आपला प्रयत्न पुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
परब यांच्या उपस्थितीमुळे जत्रेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या भेटीमुळे भाजपाच्या विकासकामांना आणखी गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आरवली सरपंच समीर कांबळी, माजी सरपंच तातोबा कुडव, माजी उपसरपंच मयूर आरोलकर, सागरतीर्थ सरपंच एकनाथ (शेखर) कुडव, वेतोबा देवस्थान समिती अध्यक्ष जयवंत राय, सदस्य प्रसाद साळगावकर तसेच आरवली शक्ति केंद्रप्रमुख नाईक व भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर गोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
