बांदा येथे १३ डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१९-: मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी, बांदा यांच्या कायम ठेव देणगीतून त्यांचे वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाडकणीं वक्तृत्व स्पर्धेचे हे २१ वे वर्ष आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इयत्ता पाचवी ते सातवी या प्राथमिक गटातून दोन स्पर्धक व इयत्ता आठवी ते दहावी या माध्यमिक गटातून दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
प्राथमिक गटासाठी ‘वाचनाचे महत्व’ व ‘माझा आवडता संशोधक’ हे विषय ठेवण्यात आले असून वेळ ४ मिनिटे आहे. माध्यमिक गटासाठी ‘माझा आवडता कवी’ व ‘व्यायामाचे महत्व’ हे विषय ठेवण्यात आले असून वेळ ५ मिनिटे आहे. स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करावयाचे आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धक शाळांनी आपले अर्ज दिनांक १० डिसेंबर २०२५ पूर्वी ग्रंथपाल, नट वाचनालय, बांदा यांचेकडे पोहोचतील असे पाठवावेत. स्पर्धेत आपल्या शाळेचे स्पर्धक पाठवून सदर स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो. ७७९६८३१२५६ येथे संपर्क साधावा.

You cannot copy content of this page