वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूकीच्या भाजपा च्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ले ता.१८-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप व 20 नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री देवी सातेरी व ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, नगरसेवक पदाचे उमेदवार मंजुषा आरोलकर, रवी शिरसाट, गौरी माईणकर, प्रीतम सावंत, विनायक उर्फ सुहास गवंडळकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, तातोबा पालयेकर, सुषमा प्रभूखानोलकर, विनय नेरूरकर, रिया केरकर, सदानंद गिरप, काजल गिरप, सचिन शेट्ये, श्रेया मयेकर, प्रसाद गुरव, युवराज जाधव, यशस्वी नाईक, प्रणव वायंगणकर, शीतल द्यानेश्वर आंगचेकर , भूषण आंगचेकर, माजी नगराध्यक्ष दाजी परब ,खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, समीर कुडाळकर, नामदेव सरमळकर, विलास कुबल, राजन केरकर, किरण कुबल, निलेश गवस, योगेश नाईक, सुदेश आंगचेकर ,गणेश माईणकर, सत्यवान परब , राजन केरकर , नितीन चव्हाण , मनवेल फर्नांडिस , सायमन आल्मेडा , शरद मेस्त्री , भानु मांजरेकर , रफिक शेख , पुंडलिक हळदणकर तसेच अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page