भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे अनंतात विलीन…

⚡बांदा ता.१८-: दोडामार्ग येथील भाजपचे नेते माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मराठे यांचे मंगळवार पहाटे म्हापसा गोवा येथे अल्प आजारपणामुळे उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या पार्थिवाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजु राऊळ, गुरुनाथ दामले, एकनाथ नाडकर्णी, राजेंद म्हापेहकर,श्याम कल्याणकर ,साईप्रसाद नाईक, सौ. श्वेता कोरगावकर, शितल राऊळ, भाऊ वळंजु, शशि पित्रे, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, रंगनाथ गवस,शिरिष नाईक,महेश गवस,तालुकाध्यक्ष दीपक गवस, पराशर सावंत, आनंद तळणकर, सौ. स्मिता आठलेकर, यशवंत आठलेकर, सौ. संध्या प्रसादी, संजय विर्नोडकर, मंदार कल्याणकर, अभय सातार्डेकर, दोडामार्ग तहसिलदार राहुल गुरव तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत, उपसरपंच रमाकांत गवस, झोळंबे उपसरपंच विनायक गाडगीळ, भैय्या नाईक, चंद्रशेखर देसाई, नाना देसाई यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी श्री. मराठे यांच्या असंख्य चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा न्यायाधीश चंद्रशेखर मराठे,सुन न्यायाधीश सौ. सोनाली मराठे, मुलगी ,भाऊ, भावजय, पुतणे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page