⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.मत्स्य व बंदर विकासमंत्री व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सोमवारी सायंकाळी उशिरा भाजपा तालुका कार्यालयात बैठक संपन्न झाली. नगराध्यक्ष पदासाठी दिलीप(राजन) लक्ष्मण गिरप व विनायक (सुहास ) सदानंद गवंडळकर असे भाजपातर्फे 2 अर्ज दाखल करण्यात आले होते.आज झालेल्या उमेदवार निश्चिती बैठकीस जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर,दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष पप्पू परब, राजू राऊळ, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक,पुंडलिक हळदणकर, संकेत धुरी, सुजाता पडवळ तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार उपस्थित होते. यावेळी भाजपातर्फे 10 प्रभागातून उमेदवारांची मिश्चिती करण्यात आली.भाजपच्या ध्येय धोरणनुसार जुन्या – नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही भाजपा नगरसेवक- नगरसेविकात थोडी ख़ुशी – थोडा गम अनुभवायस मिळाला.
वेंगुर्ला भाजपातर्फे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या नावावर शिक्कामोर्तब…
